नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आता आम्ही अंतिम संधी देत आहोत. विधानसभा अध्यक्षांनी ३० ऑक्टोबरपर्यंत आमदार अपात्रतेच्या सुनावणी संदर्भात नवीन वेळापत्रक सादर करावं, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना सुनावले आहे.
सुनावणीतील महत्वाचे सात मुद्दे
- सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे वेळपत्रकाची मागणी
- आजचं वेळापत्रक देणं अव्यवहार्य - तुषार मेहता
- विधानसभा अध्यक्षांच्या वेळपत्रकाबाबत आम्ही नाराज - सर्वोच्च न्यायालय
- कागदपत्र देऊनही अध्यक्षांकडून वेळकाढूपणा - कपिल सिब्बल
- विधानसभा अध्यक्षांना अखेरची संधी - सर्वोच्च न्यायालय
- 30 ऑक्टोबरला सुधारित वेळापत्रक सादर करा - सर्वोच्च न्यायालय
- सुधारित वेळापत्रक अमान्य झाल्यास आम्ही वेळापत्रक ठरवू - सर्वोच्च न्यायालय