क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानचा तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणारा साक्षीदार प्रभाकर साईलला एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले आहे.
आर्यन खान अटक प्रकरणात एनसीबीचे अधिकारी पैसे उकळणार होते, असा गंभीर आरोप साक्षीदार प्रभाकर साईलने केला आहे. याच आरोपानंतर चौकशीसाठी प्रभाकर साईलला समन्स पाठवण्यात आले आहे. 28 ऑक्टोबर रोजी साईल यांना एनसीबीसमोर हजर राहावे लागणार आहे.
साईल यांनी केलेल्या आरोपांची दखल घेत एनसीबीने चौकशी पथक नेमलेलं आहे. पाच अधिकाऱ्यांचं हे पथक दिल्लीहून मुंबईला येत आहे. याच पथकाकडून साईल यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच यावेळी हे अधिकारी साईल यांचीदेखील चौकशी करणार आहेत. याच कारणामुळे साईल यांना समन्स पाठवण्यात आले आहे.