सांगली जिल्ह्यातील सुलतान या बोकडाची सद्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा बोकड चक्क काजू आणि बदाम फस्त करतो.. या सुलतान ला बकरी ईद साठी लाखो रुपयांची मागणी होत आहे.
इस्लाम धर्मातील पवित्र सण म्हणजे बकरी ईद. या दिवशी बोकडांची कुर्बानी दिली जाते.तर बोकडाच्या डोक्यावर चंद्र असल्याने त्याला मागणी मोठ्या प्रमाणात असते.असाच एक बोकड सुलतान हा सांगलीच्या मिरज तालुक्यातील सुभाष नगर मध्ये आहे. एकीकडे सगळे लोक सध्या विविध चिंतांनी त्रस्त असले तरी एक सुलतान मात्र मजेत काजू-बदाम खातोय हा सुलतान दुसरा तिसरा कोणी नसून एक बोकड आहे.
मिरजेतील सोनू शेट्टी आणि त्याची आई गेल्या अनेक वर्षापासून शेळी पाळतात. त्याचा शेळी पालनाचा व्यवसाय असून त्यांच्यापैकी एका शेळीने या सुलतानला जन्म दिला आहे.त्याच्या कपाळावर चांद असल्यानं त्याला लाखो मध्ये मागणी होत आहे.