महाराष्ट्र

खंडाळा तालुक्यात विवाहितेची आत्महत्या,कोपर्डे येथे तणावाचे वातावरण

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप, सातारा | साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील कोपर्डे येथे विवाहितेच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी सासरच्या घरी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवल्याने अनुचित प्रकार टळला आहे.

कोपर्डे येथील एक दाम्पत्य आपल्या मुलासमवेत गुजरात येथील नवसारी येथे नोकरी निमित्ताने वास्तव्यास होत.यामध्ये मृत विवाहिता ही बारामती तालुक्यातील असून तिने गुजरात येथे आत्महत्या केल्याने माहेरकडील नातेवाईकांनी सासरच्या दारातच अग्नी दिल्याने तणाव वाढत गेला. यावेळी नातेवाईकांच्यात वादवादीचा प्रसंग उद्भवल्याने घटनास्थळी लोणंद पोलीस दाखल झाले. नातेवाईक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन तणाव आणखी वाढत गेला.

यावेळी लोणंद पोलिसांनी शांततेने प्रकरण हाताळत दोन्ही बाजूकडील नातेवाईकांना शांततेचे आवाहन केल्याने वादावर अखेर पडदा पडला आहे. पुढील तपास लोणंद पोलिस करत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी दिली आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका