दिल्ली एनसीआरमध्ये गुरुवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. हे धक्के 2 वाजून 40 मिनिटांनी जाणवले आहेत. पाकिस्तानातही विविध भागांमध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे हे धक्के जम्मू काश्मीर येथेही जाणवले आहेत. नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरीदाबाद मध्येही भूकंपाचे हलके धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्ट्र स्केलवर 6.1 इतकी नोंदविण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंदुकुश क्षेत्रात जमिनीच्या आत 192 किलोमीटर खोलवर असल्याचे सांगण्यात आले.
गुरुवारी दुपारच्या सुमारास दिल्ली-एनसीआर, पंजाबसह चंदीगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपामुळे पुन्हा एकदा जमीन हारदरली. बराच वेळ या भूकंपाचे हे धक्के जाणवत होते. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे होता आणि हिंदुकुश भागात त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी होती.
एकानंतर एक आलेल्या दोन भूकंपांच्या धक्क्यांमध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तीव्र धक्क्यांमुळे लोक घाबरुन घर आणि कार्यालयांच्या बाहेर निघाले. सुदैवाने या भूकंपामुळे सध्या कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र तीव्र धक्क्यांमुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दिल्ली-एनसीआरसोबतच पंजाब आणि जम्मू-काश्मिरच्या पुंछ जिल्ह्यातील पीर पंचाल क्षेत्राच्या दक्षिणमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.