मुंबईत पाच दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. बंदची हाक दिल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पातळीवर बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आलं आहे.
बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून कृष्णजन्म आणि गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
त्यासाठी सर्वत्र नाकाबंदी व शोधमोहीम राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या असून स्थानिक पातळीवर बंदोबस्त ठेवण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आली आहे.