शिवसेना नेते खासदार विनायक राऊत याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळगाव मालवण येथील बंगल्यावर अज्ञात व्यक्तींनी सोड्याच्या बाटल्या तसेच दगडफेक केली.
सध्या कोकणात हाय प्रोफाईल राजकीय ड्रामा सुरू आहे. नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रे दरम्यान केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. याच प्रकरणावरून राणे यांना अटक करण्यात आली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटत असल्याचे दिसून येत असून पोलिसांकडून सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.