नवी दिल्ली : काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी एकनाथ शिंदेंनी जोरदार भाषण केले आहे. तसेच, शिवरायांचा पुतळा शिवसैनिकांना सदैव प्रेरित करेल, असे त्यांनी म्हंटले आहे.