महाराष्ट्र

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त

सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला.

Published by : Siddhi Naringrekar

सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला. याच पार्श्वभूमीवर आता सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेसंदर्भात चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.

भारतीय नौदलाचे कमांडर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून बांधकाम विभागाचे सचिव तसंच मुंबई आयआयटीमधील तज्ज्ञांचा चौकशी समितीत समावेश करण्यात आला आहे.

राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेमागील कारणे शोधण्याचं काम समिती करणार आहे यासोबतच दुर्घटनेतील दोषींना शोधण्याचं काम देखील ही चौकशी समिती करणार असल्याची माहिती मिळत आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान

५० हून अधिक मतदारसंघांत नामसाधर्म्य असलेले उमेदवार: मतविभाजनाची भीती

अंबरनाथमध्ये मुस्लिम जमातचा डॉ. बालाजी किणीकर यांना पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या नवी मुंबईत सभा; वाहतुकीत मोठा बदल

Salman Khan : सलमान खान धमकी प्रकरणी कर्नाटकमधून एकाला अटक