राज्यात ३ जून पर्यंत मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण तो कालावधी कधीच उलटून गेला आहे. परिणामी ३ जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवलेला मान्सून (Monsoon) पुढच्या ७ ते १० दिवसांमध्ये म्हणजेच १२ जूनपर्यंत राज्यात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या दरम्यान पुणे हवामान विभागाचे (Meteorological Department) प्रमुख अनुपम कश्यपी यांनी मान्सूनच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. राज्यात येत्या ७ ते १० दिवसात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या सोबतच आता मान्सून अरब समुद्र, बंगालची खाडी, केरळ आणि तमिळनाडू आणि कर्नाटकातील काही भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. पाऊस फार जोरदार नसेल, मध्यम ते कमी प्रमाणात कोकण, मध्य महाराष्ट्र घाट भागात पुढील २-४ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.