राज्य शासन राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करणार होते. परंतु अजून ती योजना लागू केली नाही. ती योजना रद्द करून जुनी पेन्शन योजनाच सुरु करा. जर का जुनी योजना चालू केली नाही तर आम्ही डिसेंबर महिन्यात संप करू अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली आहे.
दरम्यान केंद्र शासनाची राष्ट्रीय पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यात येईल. केंद्र शासनाच्या या योजनेतून 16 वर्षामध्ये एनपीएस धारकाचे आणि त्यांच्या परिवाराचे जीवन सुसह्य होईल. तसेच ग्रॅच्युईटी, राजा रोखीकरण, मृत एनपीएस धारक कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्ती वेतन अश्या अनेक योजना सुरु केल्या आहेत. पण या बाबत राज्य शासनाने कोणतीही सकारात्मक निर्णय दिला नाही, म्हणून आम्ही डिसेंबरमध्ये सर्व संपावर जावू.