गेले दोन महिन्यांहून अधिककाळ विलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरु असलेला एसटी कामगारांचा संप मुंबईच्या कामगार न्यायालयाने बेकादेशीर ठरवला आहे.
कामगारांनी संप पुकारल्यामुळे वाहतूक बंद पडली होती. त्यामुळे नागरीकांचे हाल होत होते. हा संप बेकादेशीर ठरविण्यासाठी महामंडळ प्रशासनाने मुंबईसह राज्यभरातील सर्व कामगार न्यायालयात तक्रार दाखल केल्या आहेत. यासंदर्भात मुंबईच्या कामगार न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीवर सोमवार, दि. १७ जानेवारी २०२२ रोजी सुनावणी झाली असता माननीय न्यायालयाने विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी पुकारलेला संप बेकायदेशीर ठरवला आहे. या निर्णयामुळे महामंडळाला मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाने आतापर्यत कामगारांविरोधात केलेल्या निलंबन, सेवासमाप्ती तसेच बडतर्फ सारख्या कारवाया वैध ठरणार आहेत. कामगार न्यायालयात एसटी महामंडळाच्यावतीने ॲड. गुरुनाथ नाईक जोरदार युक्तिवाद करत प्रशासनाची बाजू भक्कमपणे मांडली.विशेष म्हणजे यापूर्वी औद्योगिक न्यायालयाने देखील २९ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार कामगारांनी कोणत्याही बेकायदेशीर संपावर जाऊ नये असे निर्देश दिले होते. तरीही कामगारांचा संप सुरुच होता.