अनिल ठाकरे, चंद्रपूर | राज्य सरकारनं संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात पहिली कारवाई केली. चंद्रपुरातील 14 संपकरी कर्मचाऱ्यांचं निलंबन आज करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा आगार, चंद्रपूर आगार आणि विभागीय कार्यशाळा या 3 घटकातील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे.
दिवाळीपूर्वी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली होती. तर चंद्रपुरातून अनिश्चित कालीन संपाची घोषणा झाली होती. त्यानंतर आज चंद्रपुरातील 14 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. आयुष्यभर शिस्तित सेवा केल्याचं फळ दिल्याची संतप्त प्रतिक्रिया या कर्मचाऱ्यांनी दिलीय. 36 एसटी कर्मचारी हुतात्मे झाले. त्यापुढे हे निलंबन शुल्लक असल्याचंही एसटी कर्मचारी म्हणत आहेत.
हायकोर्टानं हा संप बेकायदेशीर आहे असं जाहीर करुनही हा संप सुरुय. कोर्टानं सूचना केलीय की अवमान याचिका दाखल करु शकता. त्यानुसार एसटी महामंडळ संपाबाबत अवमान याचिका दाखल करत आहे, असंही अनिल परब यांनी सांगितलं.