महाराष्ट्र

St Employee Strike | एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, खासगी चालकांना घेणार

Published by : Lokshahi News

राज्यात सूरू असलेला एसटी संप मिटता मिटत नाही आहे. त्यात गेल्या दोन महिन्यांपासून प्रवाशांची फार गैरसोय झाली आहे. त्यामुळे आता ही गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळ चालक म्हणून ७५० खासगी चालकांना कामावर दाखल करून घेत आहे. याशिवाय महामंडळाने कामावर हजर न होणाऱ्या आणि संपावर ठाम असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई सुरूच ठेवली आहे.

एसटी महामंडाळाने प्रवाशांना एसटी सेवा मिळावी हा हेतू असल्याचं सांगत मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार महामंडळ चालक म्हणून ७५० खासगी चालकांना कामावर दाखल करून घेत आहे. याशिवाय महामंडळाने कामावर हजर न होणाऱ्या आणि संपावर ठाम असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई सुरूच ठेवली आहे. याचीही आकडेवारी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्वतः माध्यमांसमोर ठेवली. तसेच बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येत नाही, असं नमूद करत संपावर ठाम असणाऱ्या कामगारांना इशारा दिलाय.

शेखर चन्ने म्हणाले, "एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले, तर त्यांच्यावर कारवाई करणार नाही. ७५० खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यात येत आहेत. जे सेवानिवृत्त झाले आहेत, ज्यांचे वय ६२ पेक्षा कमी आहे, जे फिट आहेत त्यांना काही काळ कामासाठी घेणार आहोत. एसटी सेवा प्रवाशांना मिळावी हा खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यामागचा हेतू आहे."

३१०० कर्मचारी सेवेतून बडतर्फ

एसटी कामगारांवरील कारवाईची माहिती देताना ते म्हणाले, "संप सुरू झाला तेव्हा पटावर ९२ हजार कर्मचारी होते. त्यानंतर रोजंदारीवर असलेल्या २००० लोकांची सेवासमाप्ती झाली. कालपर्यंत (१३ जानेवारी) ३१०० कर्मचारी सेवेतून बडतर्फ झालेत. साधारणतः या काळात संप केल्याने आणि इतर काही कारणाने आम्हाला ५००० कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त कराव्या लागल्या. साधारणतः ८७ ते ८८ हजार कर्मचारी आत्ता पटावर आहेत. यापैकी २६ हजार ५०० कर्मचारी आत्ता कामावर आहेत."असं शेखर चन्ने म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result