कुणाल जमदाडे, शिर्डी / अहमदनगर | राज्यात सुरू असलेल्या एसटी संपावर अद्याप तोडगा निघाला नाही आहे. राज्य सरकारने ऐतिहासिक पगारवाढ देऊन सुद्घा एसटी कर्मचाऱ्यांचा संप सूरूच आहे. त्यामुळे हा संप मिटावा यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी साईबाबांना साकडे घातले आहे.
मुंबई मील कामगारांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवला जात असल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचारी संपावरून राजकारण तापलं आहे. एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असतानाच विरोधकांनी देखील या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका सुरूच ठेवली आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे शिर्डीत साईदर्शनासाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी साईंची मनोभावे आरती केली.एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप आणि साईदर्शनास हजेरी याबाबत लोकशाही न्यूजला परब यांनी प्रतिक्रिया दिली. 'मी नियमित दर्शनाला येतो तसेच परबांनी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं,असे यावेळी आवाहन केले.