महाराष्ट्र

Anil Parab | राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय-अनिल परब

Published by : Lokshahi News

आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला. विलीनीकरणाचा निर्णय समितीने दिला तर तो मान्य असेल. पण तो निर्णय येईपर्यंत किंबहूना निर्णय होईपर्यंत तिढा असाच ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारने कामगारांच्या पगारात वाढ करण्याची घोषणा अनिल परब यांनी केली. या पगारवाढीवरून कर्मचारी नाखूश आहेत. अनिल परब पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उपस्थित होते.

महत्वाचे मुद्दे LIVE

  • विलीनीकरणाचा निर्णय समीतीचा निर्णय आल्यावर
  • समितीचा निर्णय राज्य सरकार मान्य करणार
  • विलीनीकरण होईपर्यंत पगारवाढीचा निर्णय
  • राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 41 टक्के वाढ
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात 5 हजाराची वाढ
  • 10 ते 20 वर्ष अनुभव असणार्या पगारात 4 हजाराची वाढ
  • 10 वर्ष सेवेपर्यतच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 5 हजाराची वाढ
  • एसटी कर्मचाऱ्यांचा पगार 10 तारखेच्या आत होणार
  • 40 हजारांवरील पगार असणार्यांची अडीच हजाराची वाढ
  • 20 ते 30 अनुभव असणाऱ्यांची पगारात 3 हजाराची वाढ
  • सर्व कर्मचार्य़ानी उद्या कामावर हजर रहावे.
  • निलंबन मागे घेणार, सेवा समाप्ती मागे घेणार
  • संप मागे घेण्याचं अनिल परबांचं आवाहन
  • पगारवाढीमुळे 60 हजार कोटीचा बोजा तिजोरीवर

पगारवाढ किती आणि कोणाला ?

जे कर्मचारी एक वर्ष ते 10 वर्ष कॅटेगिरीत आहेत. त्यांच्या मूळ वेतनात पाच हजाराची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचं मूळ वेतन 12 हजार 80 होतं त्यांचं वेतन 17 हजार 80 रुपये झालं आहे. ज्यांच मूळ वेतन 17 हजार होतं. त्यांना 24 हजार पगार होणार आहे. ही वाढ 41 टक्के आहे. आतापर्यंतच्या एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ आहे. 10 ते 20 वर्षापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 4 हजाराने वाढ केली आहे. ज्यांचा पगार 16 हजार होता. त्यांचा पगार 23 हजार 40 झाला आहे. वाढ केल्यानंतर त्यांचा पगार 28 हजार झाला आहे. 20 वर्षे त्याहून अधिक असणाऱ्या कामगारांना 2 हजार 500 ने वाढ देण्यात येणार आहे. ज्यांचं मूळ वेतन 26 हजार रुपये होतं आणि त्यांचं स्थूल वेतन 37 हजार 440 रुपये होतं. त्यांचा पूर्ण पगार आता 41 हजार 40 झालं आहे. ज्यांचं मूळ वेतन 37 हजार होतं आणि स्थुल वेतन 53 हजार 280 रुपये होतं. त्यांचा मुळ वेतन 39 हजार 500 होईल, तर सुधारित वेतन 56 हजार 880 रुपये होईल, असं त्यांनी सांगितलं.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी