राज्यात एकीकडे अजान आणि हनुमान चालीसाचा वाद सुरू आहे. अजान झाल्यास मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर (loudspeakers) हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्याचे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. त्यानंतर राज्यात राजकारण सुरु झाले. गेल्या आठवडाभर हनुमान चालीसा याच विषयांवर चर्चा सुरु आहे. राज्यात संवेदनशील परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या सुट्याही रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एक व्हायरल व्हिडिओ चर्चेचा ठरला आहे.
मशिदीमधील एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत मशिदीत एक माकड दिसतंय. मशिदीत अजान सुरू आहे आणि हे माकड एका मुलाला डोकं खाली टेकवावं म्हणून प्रयत्न करतंय. हनुमानाला हिंदुमध्ये माकडाचा अवतार मानलं जातं. त्यामुळे हनुमान चालीसावरून राजकारण सुरू असताना मशिदीत हनुमान अवतरल्याचं हे चित्र आहे.