भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.मुंबई सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार असणार आहे.
सोमय्यांचे वकिल काय म्हणाले ?
आम्ही याविरोधात आता हायकोर्टात धाव घेणार आहे. आता या प्रकरणात आणखी काही सांगता येणार नाही, अशी माहिती किरीट सोमय्यांच्या वकिलांनी दिली. तसेच आज फक्त किरीट सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी होणार आहे.
आयएनएस विक्रांत (INS Vikrant) बचावसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याचा सोमय्या पिता- पुत्रांवर (Kirit Somaiya) आरोप आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्यांची (Kirit Somaiya) विक्रांत फाईल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी (INS Vikrant) गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. पण न्यायालयानं राखून ठेवलेला होता.तो आता जाहीर करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि नील सोमय्या सोमय्या (Neil Somaiya) यांच्या अटकपूर्व अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.