महाराष्ट्र

वाढदिवसाचं निमित्त…भाजपाने खड्ड्यात कापला केक

Published by : Lokshahi News

समीर महाडेश्वर । सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या वतीने एक अनॊखा वाढदिवस साजरा कऱण्यात आला. रस्त्यावरील खड्ड्याला झालेल्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपने थेट खड्ड्यातच केले कापला. या वाढदिवसाची एकच चर्चा जिल्ह्यात रंगली असून नेमकं हे निमित्त कोणाच्या वाढदिवसाचे होते असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच शिवसेनेला डिवचण्यासाठी तर हा वाढदिवस साजरा केला जात नाही ना ? अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कुडाळ पाट वेंगुर्ले रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे कुडाळ भाजपच्या वतीने उपहासात्मक खड्ड्यात केक कापून खड्ड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कुडाळ पाट वेंगुर्ला रस्त्यावर बी.एस.एन.एल. कार्यालयासमोर हे उपहासात्मक आंदोलन करण्यात आलं.या रस्त्यांची ठीक ठीकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे दुर्दशा झाली आहे नागरिकांना, वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील खड्ड्यांना आता १ वर्ष पूर्ण झालंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाल जाग येत नसल्यामुळे भाजपच्या वतीने खड्ड्याचा खड्ड्यातील पाण्यात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील वाढदिवस आहे. त्यामुळे शिवसेनेला डिवचण्यासाठी आणि प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी भाजपने असे अनोखे आंदोलन केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी