रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पेवे गावातील लोकांना स्मशानभूमी नसल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून धो-धो कोसळणार्या पावसात उघड्यावर प्रेताला अग्नी देताना मोठी कसरत करावी लागत आहे. तर काही वेळेला पावसामुळे प्रेत अर्धवट जळून विटंबना सारखा प्रकार सुद्धा घडत आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गावातील लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
पेवे गावातील स्मशान शेड निसर्ग चक्रीवादळात उध्वस्त झाली या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होऊन गेला परंतु या कालावधीत ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा स्मशानभूमीची स्मशान उभारण्यात आले नाही त्यामुळे लोकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून पावसामुळे प्रेताचे विटंबना सारखे प्रकार घडत असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे तसेच लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.