पुणे :
पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला हत्येप्रकरणी (Sidhu MooseWala Murder) पुणे पोलिसांना (Pune Police) मोठे यश हाती आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी संतोष जाधव याला पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरात येथून अटक केली होती. कुख्यात गुंड संतोष जाधव याच्या पुणे जिल्ह्यातील टोळीकडून पुणे ग्रामीण पोलीसानी १३ देसी कट्टे जप्त केले आहे. त्याचबरोबर संतोष जाधवच्या ७ सहकाऱ्यांना देखील पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे..
संतोष जाधव याच कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्याशी जवळचे संबंध होते. तसेच त्याला पुणे जिल्ह्यात देखील लॉरेंस बिश्नोई गँगसाठी एक कुख्यात गँग बनवायची होती. अस पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल आहे. मात्र पंजाबी गायक सिद्धू मुसावाला यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात संतोष जाधव सहभागी होता किंवा नाही ? हे अजूनही पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात स्पष्ट झालं नाही. सिद्धू मुसावाला हत्याकांड नंतर संतोष जाधव याने मध्यप्रदेशमध्ये मधील मंनवर गावात आपल्या एका सहकाऱ्याला देशी कट्टे खरेदी करण्यासाठी पाठविले होते. त्यानंतर संतोष जाधवचा सहकारी पुणे जिल्ह्यात देसी कट्टे घेऊन आला होता. ह्या देशी कट्ट्याच्या माध्यमातून संतोष जाधव हा पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील राज्यातील अनेक बांधकाम व्यावसायिक, उद्योजक आणि अभिनेते यांच्याकडून खंडणी वसूल करणार होता. त्यासाठी संतोष जाधव याने पुणे जिल्ह्यात आपली एक मोठी टोळी देखील तयार केली होती. या टोळीतील जीवनसिंग दर्शनसिंग नहार, श्रीराम रमेश थोरात, जयेश रतिलाल बहीराम, वैभव ऊर्फ भोला शांताराम तिटकारे,, रोहित विठ्ठल तिटकारे, सचिन बबन तिटकारे, जीशान इलाईबक्स मुंडे यांना पुणे ग्रामीण पोलिसांना अटक केली आहे.
संतोष जाधववर यापुर्वी खुनाचा गुन्हा
संतोष जाधव विरोधात पुण्यातील मंचर पोलीस स्टेशनमध्ये एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात देखील संतोष जाधवचे मुख्य संशयित मारेकरी म्हणून नाव समोर आले आहे. त्यामुळे सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधवला अटक करण्यासाठी चार पथक गठीत केले होते. या पथकाने आरोपी संतोष जाधवला गुजरात येथून अटक केली आहे. त्याला पुण्यातील जिन्हा न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता संतोषला २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.