महाराष्ट्र

शिंदे समर्थकांना धमकावून सरकार पाडलं, 50 घ्या नाहीतर...; कोणी केला दावा?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी एकनाथ शिंदेंच्या उठावाबाबत मोठा खळबळजनक दावा केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी एकनाथ शिंदेंच्या उठावाबाबत मोठा खळबळजनक दावा केला आहे. 50 कोटी घ्या नाहीतर जेलमध्ये जा, असं धमकावून सरकार फोडल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला आहे. श्याम मानवांनी त्यांच्या मित्राच्या हवाल्यानं हा दावा केल्याचे सांगितले आहे. या दाव्यानुसार गुवाहटीला गेलेल्या त्यांचा मित्र असलेल्या मंत्र्यासह सर्व आमदारांना धमकावण्यात आलं. मंत्रिमंडळातला श्याम मानव यांचा तो मित्र कोण अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

श्याम मानव म्हणाले की, न्यायालयात न्याय मिळेल याची काही गॅरंटी नाही. माझा एक मित्र मंत्रिमंडळामध्ये मंत्री होता, तो गुवाहाटीवरून परत आला होता. त्यावेळेस 50 घ्या नाहीतर जेलमध्ये जा. चार-पाच लोकांचे कागद तयार आहे. चाळीसही लोकांचे कागद तयार आहे. मंत्रिपद मिळणार नसेल तर 50 घ्या. तसेच, न्यायालयाच्या निर्णयांची चिंता करू नका, असे त्यावेळेस त्या माणसाने सांगितलं होतं. आणि खरंच तसेच झालं कोणीही डिस्क्वालिफाय झाले नाही. उपाध्यक्षांनाही काहीच करता आलं नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय देखील असे येईल की अडीच वर्षे सरकार चाललं आणि ऑपरेशन सक्सेसफुल झालं, असे त्यांनी म्हंटले आहे.

मला आश्चर्य वाटते की गुवाहटीवरून परत आलेला हा माणूस असं सांगतो आणि दिल्लीवरुन गृहमंत्री अमित शहा डायरेक्ट आमच्यासोबत कॉन्फरन्समध्ये बोलत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. या देशातील न्यायव्यवस्था कॉम्प्रमाईज आहे, देशातील इलेक्शन कमिशनर कॉम्प्रमाईज आहे, असेदेखील श्याम मानव यांनी म्हंटले आहे.

ईडीपासून सर्व गोष्टींचा वापर कसा केला जातो याचा किस्सा अनिल देशमुखांच्या उदाहरणावरून दिसतोय, असंही श्याम मानव म्हणाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख 12-13 महिने जेलमध्ये राहिले. मुंबईच्या पोलीस कमिशनरने अफिडेवीट लिहून दिलं की अनिल देशमुख महिन्याचे शंभर कोटी मागतात. पुढे जेव्हा कोर्टात त्यांची साक्ष झाली मला कधी ते डायरेक्ट असे बोलले नाही, असे लिहिलं होतं. ज्या दिवशी अनिल देशमुखांना अटक झाली त्यांचा आदल्या दिवशीची एका माणसाचा फोन त्यांना आला आणि सांगण्यात आले की चार पद्धतीचा अफिडेट लिहून द्या.

1) मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी मला बोलावलं आणि एक आदेश दिला दर महिन्याला शंभर कोटी गोळा करायचे.

2) उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरेंनी दिशा सालीयन यांचा खून केलेला आहे.

3) अनिल परब यांचे हॉटेल वगैरे आहे त्यांची ती अवैध मालमत्ता आहे.

4) अजितदादांनी सिंचन घोटाळ्यामध्ये एवढ्या भ्रष्टाचार केला आहे, असं अफिडेवीट लिहून द्यावे.

नंतर, आठ वाजेनंतर पुन्हा त्या माणसाचा फोन आला आणि सांगितले की, अजित दादांना तुम्ही सोडून बाकी तीन अफिडेवीट लिहून द्या. असं जर लिहून दिलं असतं तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना अनिल देशमुखांबरोबर जेलमध्ये जावं लागलं असते. परंतु दुसऱ्या दिवशी धाडसत्र सुरू झालं आणि दुपारी ते जेलमध्ये गेले की जेलमध्ये त्यांना जावं लागलं. कदाचित अनिल देशमुख हे प्रत्यक्षरीत्या सांगू शकत नाही पण मी जाहीरपणे सांगतो, असे श्याम मानव यांनी सांगितले आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती