महाराष्ट्र

उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतींना धमकीचे पत्र; शिवसैनिक आक्रमक

Published by : Lokshahi News

मयुरेश जाधव । उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती शुभांगी बेहनवाल यांना अज्ञाताने जीविताला धोका पोहोचवण्याची धमकी दिली आहे. बेहनवाल यांच्या केबिनमधील टेबलवर अज्ञाताने धमकीचं पात्र ठेवलं. या प्रकारानंतर महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

शुभांगी मनोहर बेहनवाल या उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती आहेत. शिवसेनेच्या सदस्य असलेल्या बेहनवाल यांना काही महिन्यांपूर्वीच सभापतीपद मिळालं आहे. यानंतर त्यांनी उल्हासनगरातील महापालिकेच्या शाळांची चौकशी सुरू केली होती. सगळीकडे व्यवस्थित सुविधा पुरवल्या जातात की नाही? याची चौकशी आणि खातरजमा त्या करत होत्या. याच दरम्यान आज सकाळी त्या महापालिकेत त्यांच्या केबिनला आल्या, त्यावेळी त्यांच्या टेबलवर धमकीचं पात्र ठेवण्यात आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.

"जास्त चौकशी करू नका, नाहीतर तुमचा पण मनोज शेलार करावा लागेल!" , असा मजकूर एका कागदावर टॉप करून तो बेहनवाल यांच्या टेबलवर ठेवण्यात आला होता. यानंतर महापालिकेत मोठी खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे पात्रात उल्लेख असलेले मनोज शेलार हे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष असून ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. मात्र ते थोडक्यात बचावले होते. शिक्षण मंडळातील भ्रष्टाचार बाहेर काढत असल्यानेच आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप शेलार यांनी केला होता. यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचीही नावं या प्रकरणात आली होती.

शिवसेना स्टाईल धडा शिकवणार

दरम्यान आता बेहनवाल यांना धमकी देणाऱ्याचा उद्देश काय आहे, हे स्पष्ट आहे. या प्रकारानंतर आपण शाळांची चौकशी करून काहीही चुकीचं केलं नसून यामागे कोण असावं? हे अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया शुभांगी बेहनवाल यांनी दिली आहे. हा प्रकार समजताच शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि ज्येष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बेहनवाल यांच्या केबिनला धाव घेत संताप व्यक्त केला. तसेच या प्रकारामागे जो कुणी असेल, त्याला शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result