महाराष्ट्र

शुभम शेळकेसह तिघांवर प्रत्येकी आणखी ३ गुन्हे दाखल

Published by : Lokshahi News

नंदकिशोर गावडे, बेळगाव | बंगळूरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाहीफेक करण्यात आली होती. या घटनेनंतर शिवभक्त आक्रमक झाले होते. यावेळी दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी आता शुभम शेळके, रमाकांत कोंडुस्कर, सरिता पाटील व शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यावर प्रत्येकी आणखी ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

बंगळूरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काळी शाई फेकण्याची घटना घडली होती. या शिवमूर्तीच्या विटंबनेनंतर १७ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीराजे चौकात बेळगाव मधील शिवभक्तांकडून आक्रोश व्यक्त करण्यात आला होता.या दरम्यान काही प्रमाणात दगडफेक झाली.त्या अनुषंगाने बेळगाव मधील एकूण सत्तावीस मराठी कार्यकर्त्यांना बेळगाव पोलिसांनी अटक केली होती.

यावेळीचं किर्लोस्कर रोडवरील शिवनेरी फोटो स्टुडिओ, बापट गल्ली येथील शांती ग्रँड हॉटेलच्या काचा अज्ञात लोकांनी फोडल्या तसेच स्टेशन रोडजवळ नवरत्न हॉटेल समोर थांबलेल्या सरकारी वाहनांच्या काचा अज्ञात लोकांकडून फोडल्या गेल्या,पण गुन्हा नोंदवताना अज्ञात असा नोंदवण्यात आला होता.मात्र आता अज्ञात लोकांसोबत शुभम शेळके, रमाकांत कोंडुस्कर, सरिता पाटील आणि प्रकाश शिरोळकर यांना सुद्धा जबाबदार ठरवून त्यांच्या विरुद्ध आणखी ३ गुन्हे खडे बाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले आहेत.

काही महिन्यांपूर्वी समाजकंटकानी मराठी फलकांची तोडफोड केली होती.तेव्हा जुजबी कारवाई करणारे पोलीस आज मराठी भाषिकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात पुढे दिसत आहेत. या दुटप्पी कारवाई मुळे शहरातील मराठी भाषिकामध्ये मात्र आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत..

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती