महाराष्ट्र

श्रावणातील पहिला सोमवार; महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मंदिरात गर्दी

Published by : Team Lokshahi

मुंबई : श्रावण मासातील आज पहिला सोमवार. यानिमित्त भाविकांनी राज्यभरातील महादेवाच्या मंदिरात गर्दी केली आहे. महादेवाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यावेळी मंदिर परिसर 'हर हर महादेव'चा जयघोषाने दुमदुमला आहे.

श्रावणाला व्रतवैकल्यांचा महिना म्हटला जातो. श्रावण महिना शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो. श्रावणात भगवान शंकराची पूजा केली जाते. कोरोनामुळे दोन वर्षे मंदिरं बंद होती. भाविकांना मंदिरात प्रवेश नव्हता. यंदा श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त सकाळपासून भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे. पहाटे शिवलिंगाची दुग्धाभिषेक व पूजा आरती करण्यात आली असून आकर्षक फुलांनी मंदिर परिसर सजवण्यात येतो. दिवसभर भाविकांची पूजा अर्चा अभिषेकची रेलचेल दिसून येते. यामुळे कोरोना काळात बंद पडलेल्या अर्थचक्राला उभारी मिळणार आहे.

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग