महाराष्ट्र

वर्ध्यात धक्कादायक घटना! विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने शेताच्या बांधावर शेतकऱ्याचा मृत्यू

भूपेश बारंगे,वर्धा | वर्धा जिल्ह्यातील तळेगांव नजीकच्या भिष्णुर येथे एका शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ता.27 जुलै ला दुपारी घडली आहे. या घटनेने भिष्णुर येथे शोककळा पसरली आहे.

Published by : Team Lokshahi

भूपेश बारंगे,वर्धा | वर्धा जिल्ह्यातील तळेगांव नजीकच्या भिष्णुर येथे एका शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ता.27 जुलै ला दुपारी घडली आहे. या घटनेने भिष्णुर येथे शोककळा पसरली आहे.

मृतक राजेश नांदने हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे 2 एकर शेतजमिन आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने शेताची पाहणी करण्यासाठी दोघेही पतिपत्नी गेले होते. शेतात कपाशी व सोयाबीन पिके असून त्याची पाहणी करताना राजेश नांदने हे धुऱ्यावरून पिकांची पाहणी करत होते. यावेळी त्यांची पत्नी काही अंतरावर शेतात काम करत होत्या. एवढ्यात विजेच्या खांबाजवळ राजेश नांदने खाली पडल्याचे पत्नीला हलताना दिसले. घटनास्थळी पत्नीने जाऊन बघताच आरडाओरडा केला. आजूबाजूचे शेतकरी धावून आले त्यावेळी शेतकरी राजेश नांदने यांच्या शरीरातून धूर निघून मृत्यू झाल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांची पत्नी थोडक्यात सुखरूप बचावली. जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्याने आज सकाळी पावसाने थोडशी उसंत दिल्याने नांदने हे आपल्या पत्नीसह शेतात गेले होते. यावेळी विजेचा धक्का लागला हे समजल्यावर शेतकऱ्यांनी नांदने यांच्या पत्नीला बाजूला केले. यावेळी पतीचा नाहक बळी गेल्याने पत्नीने हंबरडा फोडला होता. राजेश नांदने यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, पत्नी, आई-वडील आहेत. यांच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

शेतकऱ्याच्या मृत्यूला जबाबदार कोण?

मृतक राजेश नांदने यांच्या शेतात असलेल्या विजेच्या खांबावरून गेलेल्या तारांना इन्सुलेटर नसल्याने जिवंत विद्युत तारांचा संपर्क थेट अर्थिंगच्या ताराला आल्याने व अर्थिंगचा तार हा जमिनीत असल्याने ओल्या जमिनीवर ताराच्या संपर्कात आल्याने शेतकऱ्याला विद्युत प्रवाहाचा धक्का लागला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेला हा बेजबाबदारपणा कुणाचा असा प्रश्न या निमित्ताने पडला आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचा जीव गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. याला जबाबदार कोण व त्याची जबाबदारी घेणार कोण असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. महावितरणच्या कारभारामुळे चुका घडून अनेकांचे संसार उघड्यावर येतात त्यामुळे अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर तातडीची कारवाई करणे गरजेचे आहे.

भिष्णुर येथे झालेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने शेतकऱ्याच जागीच मृत्यू झाला. या घटनेने महावितरण विभागावर रोष व्यक्त होत आहे. महावितरण विभागाने पावसाळ्यापूर्वी विद्युत तारेची पाहणी करून दुरुस्ती केली असती तर अशी अनुचित घटना घडली नसती असा प्रश्न गावकरी करत आहेत. त्यामुळे या मृत्यूला महावितरण जबाबदार असल्याचे घटनास्थळी शेतकरी चर्चा करत असल्याचे समजते.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी