राज्यात गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे यांच्या राज्यसभा खासदारकीवरुन राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेनं संभाजीराजेंना शिवबंधन बांधून खासदारकीची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी स्पष्ट शब्दात नकार देत राज्यसभा निवडणुकीत आपण स्वाभीमान जपल्याचं म्हटलं. त्यानंतर शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार यांनी राज्यसभा उमेदवारीसाठी अर्ज भरला आहे. दरम्यान संजय राऊत हे आज आणि उद्या (28, 29 मे) कोल्हापूरात सभा आणि बैठकासाठी गेले आहेत. त्यावेळी ते माध्यमांना बोलताना त्यांनी 2024 च्या निवडणुकीबाबत त्यांनी अवाहन केले आहे.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी संजय राऊत हे कोल्हापूरला गेले असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी २०२४ च्या निवडणुका लढवण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत असंही ते म्हणाले. तसेच "महाविकास आघाडीने कोणताही जनतेच्या हिताचा निर्णय घेतला तर भाजपाने टीका करण्याचा पवित्रा घेतला आहे पण शिवसेना आणि महाविकासआघाडी ठामपणे पुढे जात आहे" असं ते म्हणाले.
तसेच "संभाजीराजेंना आम्ही उमेदवारीसाठी ऑफर केली होती पण त्यांनी ती स्विकारली नाही, तो प्रश्न आता संपला आहे, त्यांच्याविषयी आमच्यात आदर आणि प्रेम आहे तो तसाच राहणार आहे." असं संजय राऊत म्हणाले आहेत.