इगतपुरीत मुंबई-नाशिक राष्ट्रीय मार्गावरील खड्ड्यांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इगतपुरी येथील पिंप्री फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावरच वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला.
स्थानिक प्रशासन तसेच टोल प्रशासनाला रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आव्हान केले आहे. अन्यथा याहीपेक्षा मोठं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.