नंदकिशोर गावडे, बेळगाव | गेल्या महिनाभर अटकेत असणारे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके व उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने आज जामीन मंजूर केला आहे…
बंगलूरं मधील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या विटंबने नंतर खरंतर एकूण 62 जणांवर गुन्हे टाकत टप्याटप्याने 42 जणांना अटक करण्यात आलेलं होत..307 व राजद्रोह सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते..एकूण 42 जणांची रवानगी ही हिंडलगा कारागृहात होती.त्यापैकी आतापर्यत एकूण 5 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरापासून अटकेत असणाऱ्या सीमाभागातील मराठी मुलांना सोडविण्यासाठी वकिलांचे शर्थीचे प्रयत्न पाहायला मिळताहेत.आज युवाअध्यक्ष शुभम शेळके व उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून दोन दिवसात शुभम शेळके आणि अंकुश केसरकर यांची सुटका होणार अशी माहिती अडव्होकेट महेश बिर्जे यांनी दिली आहे.