सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) आमदार सदा सरवणकर यांची निवड करण्यात आली आहे. याच्याआधी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष होते. आज सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नेमणूक झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. गणेशोत्सवात झालेल्या शिवसेनेच्या दोन गटांतील राड्यानंतर अनेक चर्चा झाल्या.