राज्यात भाजपा नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) विरूद्ध शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात आरोप-प्रत्यारोपावरून राजकारण पेटले असताना आता एका शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी 'किरीट सोमय्या मला घाबरतो', असे विधान केले आहे. तसेच मी लोकसभेत त्यांना शक्ती कपूर म्हणून हाक मारली होती, असेही खैरे (chandrakant khaire) म्हणाले आहेत.
किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) शहरातील सिटी चौक पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की,'एकदा विमानात किरीट सोमय्या यांचा मी हात पकडला होता आणि 'अरे ऐ किरीट' म्हणालो होतो. मला किरीट सोमय्या खूप घाबरतो, मी लोकसभेत त्यांना शक्ती कपूर म्हणून हाक मारली होती, असेही खैरे (chandrakant khaire) म्हणाले.
लोकसभेत त्याला मी शक्ती कपूर म्हटलं, तो सतत हा हु हा हु करत असतो त्यामुळे मी त्याला शक्ती कपूर म्हणतो असेही खैरे म्हणाले आहेत. तसेच माझ्यावर ईडी पडू शकत नाही असा विश्वास व्यक्त करत चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) म्हणाले, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, माझ्याकडे प्रॉपर्टी नाहिए,स्वमिंग पुल,फार्महाऊस शेती नाही आहे. मी साधा माणूस मत कमावली असल्याचे खैरे म्हणाले. तसेच मतांची खंडणी घेतली पैशांची नाही असेही खैर म्हणाले.
पोलीस ठाण्यात ठिय्या....
किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत खैरे (chandrakant khaire)यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील क्रांती चौकात धाव घेतली. गुन्हा दाखल करण्याचा मागणीसाठी तब्बल दोन तासांपेक्षा अधिक वेळ खैरे पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करता येणार नाही, पण तुमचं निवेदन मुंबई पोलिसांना पाठवतो अशी भूमिका घेतली. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा मागणीसाठी उद्या आम्ही कोर्टात जाणार असल्याचे खैरे म्हणाले आहे. औरंगाबाद येथील काही लोकांनी आयएनएस विक्रांत या लढाऊ जहाजाच्या दुरुस्तीसाठी राबविण्यात आलेल्या अभियानात पैसे दिले होते, त्यामुळे त्यांची तक्रार घेतली गेली पाहिजे असेही खैरे म्हणाले आहे.