मुंबई : राज्यसभेची राजकीय धामधून अजून सुरु असतानाच शिवसेनेने विधान परिषदेसाठीही आतापासूनच तयारीला लागली आहे. शिवसेनेकडून (Shivsena) विधान परिषदेसाठी दोन नावे निश्चित करण्यात आली आहे. सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमशा पाडवी (Amsha Padvi) यांची नावे निश्चित करण्यात आल्याचे सुत्रांकडून समजते आहे.
विधान परिषदेची निवडणूक 20 जून रोजी होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9 जून आहे. त्यामुळे विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरायला आता दोनच दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित करण्यात आली आहे. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. दरम्यान, आमशा पाडवी हे नंदुरबार येथील शिवसेना नेते आहेत.
दरम्यान, राज्यसभेसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. आहे. शिवसेना व भाजपने अतिरिक्त उमेदवार उभे केले असून विजयासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेने अपक्षांच्या मतांची जुळवा-जुळव सुरु केली आहे. तर घोडेबाजार टाळण्यासाठी सर्व आमदारांना हॉटेलवर सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे.