रत्नागिरी जिल्ह्यातील 30 नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याचा मार्गावर आहे. रत्नागिरीतील 23 पेकी 20 नगरसेवक शिंदे गटात दाखल होणार असून मंडणगडमधील 8 तर दापोलीतील 3 नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यात उडाली खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेत वेगळा गट तयार केल्यापासून शिवसेनेत पडझड सुरु आहे. अनेक ठिकाणी नगरसेवक शिंदे गटात दाखल होत आहे. या बंडखोरीमुळे शिवसेनेची मोठी वाताहत झाली आहे. शिवसेनेत दोन गट पडले असून शिंदे गटाकडे मुख्यमंत्रिपद असल्यामुळे अनेक इच्छुकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. मुंबई, ठाणे, मीरा भाईंदरनंतर आता कोकणात शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील 30 नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहे, त्यामध्ये रत्नागिरी नगरपरिषदेतील 23 पैकी 20 नगससेवक तर मंडणगड मधील 8 नगरसेवक व दापोली मधील 3 नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहे. आता माजी मंत्री, बंडखोर आमदार उदय सामंत व योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 नगरसेवक लवकरच शिंदे गटात सामील होण्याच्या हालचाली सुरु असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांच्या पाठोपाठ आता उदय सामंत सुद्धा 20 नगरसेवकांना फोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
पालघर जिल्ह्यात शिवसेनेत मोठी फूट खासदार आमदारसह जिल्हाप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य शिंदे गटात सामील झाले आहे. खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाप्रमुख राजेश शहा, जि.प. गटनेता प्रकाश निकम, जिल्ह्यातील काही नगर पंचायतीचे नगरसेवक, पंचायत समिती सभापती, सदस्य आणि प्रमुख कार्यकर्त यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. पालघर मधील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी सुद्धा कोकण विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिंदे आणि फडणवीस सरकार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.