Bhavana Gavali Team Lokshahi
महाराष्ट्र

भावना गवळींना चेकमेट करण्यासाठी शिवसेनेची खेळी

उद्धव ठाकरे साथ सोडत शिंदे गटात गेलेल्या भावना गवळी यांच्यासमोरच्या शिवसेनेने आव्हान उभे केले आहे. त्यांचे पूर्वाश्रमीचे पती कॅप्टन प्रशांत सुर्वे यांना शिवसेनेत घेतले आहे.

Published by : Team Lokshahi

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरुच आहे. दोन्ही नेत्यांनी खरी शिवसेना आपलीच हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आता एकनाथ शिंदेंसोबत जे गेले आहे, त्यांना चेकमेट करण्याची खेळी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे साथ सोडत शिंदे गटात गेलेल्या भावना गवळी यांच्यासमोरच्या शिवसेनेने आव्हान उभे केले आहे. त्यांचे पूर्वाश्रमीचे पती कॅप्टन प्रशांत सुर्वे यांना शिवसेनेत घेतले आहे.

खासदार भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे यांचा 2013 मध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर 2014 मध्ये प्रशांत सुर्वे लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवली होती. त्यांचा पराभव झाला होता. प्रशांत सुर्वे हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर खासदार भावना गवळी यांच्या समोर मोठे आव्हान मतदारसंघात उभं राहण्याची शक्यता आहे.

प्रशांत सुर्वे म्हणतात...

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कॅप्टन प्रशांत सुर्वे यांनी म्हणाले की, "2014 सालीच शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी मी उद्धव ठाकरें यांना भेटलो होतो. पण त्यावेली मला पक्षाकडून काही जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला."

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड