राज्यात ओबीसी आरक्षाविना पार पडलेल्या भंडारा आणि गोंदियामधील जिल्हा परिषदांच्या २३ व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठी निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी आणि १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ जागांसाठी मंगळवारी मतदान झालं. या सर्व ठिकाणच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.
सिंधुदुर्गात शिवसेनेने नारायण राणे यांच्या वर्चस्वाला धक्का दिल्याचा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. वैभववाडी नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक नव्हता. त्याठिकाणी यंदा शिवसेनेचे ५ तर शिवसेना पुरस्कृत दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. देवगड नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचा एक नगरसेवक होत्या. त्याठिकाणीही शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मिळून ९ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे देवगड नगरपंचायतीवर आमची सत्ता येईल. तर कुडाळ नगरपंचायतीमध्ये यापूर्वी शिवसेनेचे ५ नगरसेवक होते. आता आमचे ७ नगरसेवक निवडून आले आहेत. याठिकाणी काँग्रेसने सहकार्य केल्यास आमची सत्ता येईल, असा दावा विनायक राऊत यांनी केला. ही एकूण परिस्थिती पाहता सिंधुदुर्गात शिवसेनेची ताकद वाढली आहे, असा दावाही विनायक राऊत यांनी केला.
दापोली नगरपंचायतीमध्येही शिवसेनेची सरशी
तर दापोली नगरपंचायतीमध्येही शिवसेनेची सरशी होताना दिसत आहे. याठिकाणी आतापर्यंत ११ जागांचे निकाल हाती आले आहेत. यापैकी ९ जागांवर शिवसेना तर २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे दापोलीतल रामदास कदम विरुद्ध अनिल परब या वादात शिवसेनेची स्पष्टपणे सरशी होताना दिसत आहे. राज्यातील १०५ नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहेत. आतापर्यंत यापैकी सर्वाधिक १२ नगरपंचायती शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत. तर भाजप ११ नगरपंचायतींसह दुसऱ्या स्थानावर आहे.
दापोली नगरपंचायत निवडणूकीत पालकमंत्री अनिल परब यांनी जाहीर केलेल्या शिवसेना राष्ट्रवादी आघाडीची सत्तेला मोठा विजय मिळाला आहे. रामदास कदम यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना-६, राष्ट्रवादी-८, अपक्ष -२ भाजप आणि फक्त एका जागेवर भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.