महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. निवडणुक आयोगाची कारवाई स्थगिती याचिका शिवसेनेने केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळली. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष चांगलाच पेटलेले असताना. न्यायालयाने आता निर्णय निवडणुक आयोगाकडे वर्ग केला आहे. मात्र, आता या सुनावणीची पुढची तारीख ही दिवाळीनंतर म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी आहे. राज्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या आहेत. नवरात्रीची नऊ दिवसांची सुट्टी आणि त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक आयोगाच्या कामकाजाला न्यायालयाने दिली असली तर, त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी एक महिन्याची वेळ लागणार आहे. त्यामुळे या काळात निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.