महाराष्ट्र

लष्करी ट्रेनिंग पूर्ण केलेल्या शिल्पाचे गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप | सातारा | आसाम रायफल ट्रेनिंग पुर्ण करुन आल्यानंतर जावली तालुक्यातील गांजे ग्रामस्थांनी शिल्पा चिकणे हिचे मूळगावी जंगी स्वागत केले. सैन्यदलातील प्रशिक्षण घेणारी गावातील पहिली महिला होण्याचा मान शिल्पा हिला मिळाला आहे.

गावच्या लेकीच्या स्वागताला यावेळी संपूर्ण गाव एकवटला होता. गांजे गावी पोहोचताच गावची लेक सैन्यदलातील प्रशिक्षण पूर्ण करुन परतल्याच्या आनंदाने ग्रामस्थांनी तिचे भव्य स्वागत केले. यावेळी देशभक्तीपर गीते लावून हार, पुष्पांचा वर्षाव करत शिल्पाचे जोरदार स्वागत करण्यात आले. गावातील महिलावर्ग शिल्पाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. स्वागतावेळी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. ढोल ताश्यांच्या आवाजात शिल्पाची वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. भारत माता की जय या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेला होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तोफ मुंबईत धडाडणार

Diwali 20224 : दिवाळीत कोणत्या तेलाचा दिवा लावावा? होतील अनेक शुभ काम

सुहास कांदे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला

Harshvardhan Patil : मला विश्वास आहे, महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल

Sada Sarvankar CM Shinde Meet:सरवणकरांना मुख्यमंत्र्यांचा अल्टिमेटम, शिंदेंसोबतच्या चर्चेत काय ठरलं?