सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरतं मर्यादित न ठेवता, भारतरत्न द्यावा असे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी ही मागणी केली आहे. शरद पवार म्हणाले की, कोरोनासह विविध आजारांवर मात करण्यासाठी SII च्या लस निर्मितीवर सायरस पुनावाला यांनी भर दिला.
तसेच त्यांच्या या मोलाच्या योगदानासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. असे शरद पवार म्हणाले. सायरस पुनावाला यांनी लस निर्मिती क्षेत्रात केलेल्या कामाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केलं आहे.
कोरोनामध्ये लाखो रूपयांच्या लस मोफत वाटप करून, नागरिकांची मदत करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पुनावाला यांना केंद्र सरकारनं भारतरत्न पुरस्कार द्यावा. अशी मागणी त्यांनी केली आहे.