राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात पुन्हा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीटरवरून दिली.
नवाब मलिक ट्वीटमध्ये म्हणाले, शरद पवार यांच्या पोटात पुन्हा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना आजच रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. सोमवारी देखील शरद पवारांना अशाच पद्धतीने पोटात दुखू लागल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. त्यावेळी बुधवारी त्यांची सर्जरी नियोजित करण्यात आली होती. त्यामुळे बुधवारीच शरद पवार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल होणं अपेक्षित होतं. मात्र, आज पुन्हा त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.