देशभरात सुरू असलेल्या लसीकरणासाठी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने मोहिमेची गती मंदावली आहे. यामुळे लसीकरण पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त लशींची आवश्यकता आहे. यासाठी कोरोना लशींची अतिरिक्त माहिती केंद्र सरकारकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिली जात आहे.
येत्या जून महिन्यात १२ कोटी लस उपलब्ध असतील असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलं आहे. आता सिरम इन्स्टिट्युटने केंद्र सरकारला जून १० कोटी लस देणार असल्याचं सांगितलं आहे. याबाबतचं पत्र सिरम इन्स्टिट्युटने गृहमंत्री अमित शाह यांना दिलं आहे.