गजानन वाणी, हिंगोली | राज्यात सध्या थंडी वाढत असतानाच राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. सेनगाव नगरपंचायतीची निवडणूक असल्याने प्रभाग निहाय आरक्षण सोडत झालीय. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी नगरसेवक नगराध्यक्षांना निवडणूक लढविण्याची वेळ आली.
सद्या थंडीच वातावरण असताना राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली आहे. इच्छेप्रमाणे आरक्षण न निघाल्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. तर नवीन उमेदवार त्या वॉर्डमध्ये कोण राहील याचा शोध राजकीय पक्षाकडून घेतला जात आहे. प्रभाग क्र.१ सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र २ सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग,प्रभाग क्र ४ नागरिकांचा मागास प्रवर्ग ,प्रभाग क्र ५ नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला,प्रभाग क्र ६ सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र ७ सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र ८ सुचित जाती,प्रभाग क्र ९ सर्वसाधारण,प्रभाग क्र १० सर्वसाधारण,प्रभाग क्र ११ अनुसूचित जमाती,प्रभाग क्र १२ सर्व साधारण महिला ,प्रभाग क्र १३ अनुसूचितजाती महिला,प्रभाग क्र,१४ सर्वसाधारण,प्रभाग क्र १५ नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्र १६ अनुसूचितजाती महिला,प्रभाग क्र १७ सर्व साधारण. अशी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत झाली आहे.
दरम्यान आता आरक्षणाची सोडत जाहीर झाल्याने लवकरच निवडणूकीचा कार्यक्रमही जाहीर होणार आहे. या निवडणूकीत कुणाच्या पदरात निराशा व कुणाच्या अंगावर गुलाल पडेल हे येणारा काळच ठरवेल.