महाराष्ट्र

”वसई विरारमधल्या सिफेरर्सना लसीकरणाचा दुसरा डोस द्यावा”

Published by : Lokshahi News

वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतल्या सिफेरर्सना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देत, लसीकरणाचा दुसरा डोस द्यावा,अशी मागणी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनने केली आहे. पालिका आयुक्त गंगाधरण डी यांना परिपत्रक देऊन ही मागणी करण्यात आली.

जागतिक पातळीवर अनेक देश आणि शिपिंग कंपन्यांनी "No Vaccination No Job" हे धोरण अवलंबले आहे. या अनूशंगाने 7 जून रोजी आरोग्य मंत्रालय, भारत यांच्या जीआरनुसार आंतरराष्ट्रीय प्रवासी विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरीसाठी परदेशांत जाणाऱ्यासाठी 2 डोसमधील अंतर कमी करण्यात आले आहे.

वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक सिफेरर्स आहेत जे नोकरीसाठी विदेशात जातात. तसेच सिफेरर्सला जगभरातून फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा दिला गेला आहे. आता महापालिका हद्दीतील लसीकरण केंद्रावर सिफेरर्ससाठी शक्य तितक्या लवकर प्राधान्यक्रमाने लसीकरणाचा दुसरा डोस सुरू करावा अशी मागणी वसई विरार महानगर पालिकेचे आयुक्त गंगाधरण डी यांच्याकडे ऑल इंडिया सिफेरर्स युनियन च्या वतीने करण्यात आली. यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे व पालघर जिल्हा अध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित होते.

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

IPL Mega Auction 2025 Live: राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल अन्सोल्डवर!

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव