महाराष्ट्र

Maharashtra Corona | सलग दुसऱ्या दिवशी रूग्णसंख्या ५ हजारा पार

Published by : Lokshahi News

राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णाचा आकडा ५ हजारांचा पार जात असल्याचं चित्र आहे. आज दिवसभरात ५ हजार १०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.

आज दिवसभरात ४ हजार ७३६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५२ हजार १५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.०४ टक्के इतकं झालं आहे. दुसरीकडे १५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५० हजार ३९३ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत ३९७ नवे बाधित

मुंबईत आज दिवसभरात ३९७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५०७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ टक्के आहे. तर दिवसभरात ७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ४२ हजार ४०१ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७ लाख २१ हजार २५७ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत २ हजार ७३६ सक्रिय रुग्ण आहेत. तर करोनामुळे आतापर्यंत एकून १५ हजार ९६३ जणांचा मृत्यू झाला आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी