अमोल धर्माधिकारी : पुणे | पुण्यातील शाळा 16 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे 15 डिसेंबरपर्यंत मनपाकडून बंद ठेवण्यात आल्या होत्या.
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे पुन्हा शाळांना कुलूप लावावे लागते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, राज्य सरकारकडून सावध पावले उचलली जात असून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनाला देखील निर्णय घेण्याची परवानगी दिली. त्यानुसार पुण्यातील शाळा गुरुवारपासून सुरू होणार आहेत.