वसई : वसईतील डॉ. एम.जी. परुळेकर आर.व्ही. नेरकर या शाळेतील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेले कौशिक रेगे व ओम किणी या विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त अनोखी कलाकृती साकरली आहे. राम फळ व पानावर प्रभू रामाचे चित्र काढले आहे. शाळेचे कलाशिक्षक चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी ही कलाकृती साकारली.
राम नवमीचे औचित्य साधून चक्क रामफळावर व रामफळाच्या पानावर प्रभू श्रीरामांचे चित्र रेखाटले आहे. कौशिक रेगे या विद्यार्थ्याने पोस्टर कलर्सचा वापर करून अवघ्या 30 मिनीटांमध्ये तर ओम किणी या विद्यार्थ्याने अवघ्या 45 मिनीटांमध्ये ही कलाकृती सादर केली. प्रत्येक वेळी नवनवीन कलाकृती करणारे कौशिक जाधव यांनी आपल्या शाळेतील मुलांमधील सुप्तगून ओळखून कौशिक रेगे व ओम किणी या विद्यार्थ्याकडून ही कलाकृती सादर केली. प्रथमच क्रएटीव्ह पेंटिंग करण्याचा आनंद विद्यार्थ्यांना मिळाल्याने मुलांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. या कलाकृतीचे कौतुक डॉ. एम. जी. परुळेकर शाळेचे चेअरमन कारखानीस व मुख्याध्यापिका अंजली मेनन व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले.