राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कोविड-19 महामारीमुळे या परीक्षा विलंबाने होण्याची शक्यता होतीच. त्यानुसार आता परीक्षा एप्रिल-मे मध्ये होणार आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी या दोन्ही परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या एप्रिल-मे 2021 मध्ये या परीक्षा पार पडणार आहे.यानुसार दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार असून बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणार आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही आहे.
दरम्यान दहावी-बारावी परीक्षा सर्वसाधारणपणे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जातात. पण यावर्षी कोविड-१९ महामारी स्थितीमुळे त्या ४० ते ४५ दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत.