पुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाने जाहीर केले अनुदान काही खाजगी संस्थांनी लाटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता देहविक्री करणाऱ्या महिलांनी कारवाईची मागणी केली आहे.
राज्य शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देहविक्री करणाऱ्या महीलांना लॉकडाऊच्या काळात मदत म्हणून १५ हजाराचे अनुदान घोषीत केले होते. हे अनुदान देहविक्री करणाऱ्या महीलांना मिळणे अपेक्षित होते. मात्र पुण्यातील काही खाजगी संस्थानी या महिलांना स्लम डेवलपमेंट फॉरन फंडीन अनुदान मिळण्याचे आश्वासन देत, आधार कार्ड, बँकेचे कागदपत्र आणि फोटो मागवून घेतले.
खाजगी संस्थांनी या कागदपत्रांचा गैरफायदा घेत देहविक्री करणाऱ्या महीलांची १५ हजार रक्कम जमा करत पुन्हा त्यांच्याकडून काही रक्कम काढून घेतली. या घटनेने शहरात खळबळ उडालीय.