भाजपच्या मंदिरे उघडण्याच्या आंदोलनावर काँग्रेसने टीका केलीय. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद करण्यापेक्षा लस मिळवण्यासाठी शंखनाद करा, असा सल्ला दिला.
लसीकरणामुळे कोरोना रुग्णांचे मृत्यू रोखण्यात यश आले आहे. अद्यापही कोरोना गेला नसून मंदिरे उघडण्याची घाई न करता लस मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ते कोल्हापूरात बोलत होते.