महाराष्ट्र

साताराचे सुपूत्र सुरज शेळके यांना लेहमध्ये वीरमरण

लष्करात सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

प्रशांत जगताप | सातारा : येथील खटाव गावातील 24 वर्षीय जवानाला यांना जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण आले आहे. लेह लडाख येथे ऑपरेशन रक्षक सुरू असताना कर्तव्य बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आले आहे. लष्करात सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

जवान सुरज शेळके हे 7 मार्च रोजी सुट्टी संपवून लेह लडाख येथे पुन्हा लष्करी सेवेत रुजू झाले होते. 4 वर्षांपूर्वी आटलरी-141 फिल्ड रेजिमेंट येथे ते भरती झाले होते. त्यांचे वय केवळ 24 वर्ष असून त्यांनी 4 वर्ष लष्करी सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

दरम्यान, उद्या सायंकाळी 7 वाजता त्यांचे पार्थिव मूळ गावी येणार असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आह.. सुरज यांच्या विरमरणाने शेळके कुटुंबावर आणि खटाव गावावर शोककळा पसरली आहे..

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी