Bailgada Sharyat Team Lokshahi
महाराष्ट्र

साताऱ्यात लम्पीचा उद्रेक; शर्यतीला सशर्त परवानगी देण्याची बैलगाडा मालकांची मागणी

सातारा जिल्ह्यातील बैलगाडा मालाकांनी ज्या जनावरांचं लसीकरण पुर्ण झालं आहे अश्या जनावरांच्या शर्यतीला सशर्त परवानगी देण्याची मागणी केली आहे.

Published by : Vikrant Shinde

प्रशांत जगताप | सातारा: महाराष्ट्रामध्ये मागच्या अनेक दशकांपासून बैलगाडा शर्यत होत आली आहे. मागील काही काळात PETA (People for the Ethical Treatment of Animals) या संस्थेने आक्षेप घेतल्यामुळे बैलगाडा शर्यत भरवण्यासंदर्भातील वाद न्यायालयात होता. मात्र, न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर बैलगाडा शर्यती पुन्हा भरवल्या जाऊ लागल्या. आता देशभरात पसरलेल्या लम्पी या जनावरांमधील संसर्गजन्य रोगामुळे पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत बंद झाली आहे.

साताऱ्यातील लम्पीचा प्रादुर्भाव:

सातारा जिल्ह्यात लम्पीचा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय. जिल्ह्यामध्ये दिवसागणिक 60-70 लम्पीने बाधित झालेली नवी जनावरं आढळत आहेत. काल जिल्ह्यामध्ये 10 जनावरांचा मृत्यू झाला तर, परवा 7 जनावरं दगावली होती. त्यामुळे जिल्ह्यांत लम्पीचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या गाय आणि बैल वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 7 सप्टेंबरपासून जनावरांच्या वाहतुकीवर,बाजार भरवण्यावर आणि शर्यतीवर बंदी घातली आहे.

बैलगाडा मालकांची चिंता:

शर्यतीसाठीचे बैल हे प्रचंड महाग असतात. शर्यतीसाठीचे बैल विकत घेण्यासाठी बैलगाडा मालकांना कमीत कमी 5 लाख इतकी मोठी रक्कम मोजावी लागते.दरम्यान, प्रशासनाच्या नियमांनुसाल जर, शर्यती बंद राहील्या तर, बैलांची कसरत थांबल्यानं बैल सुस्तावतील व लम्पीचा प्रादुर्भाव संपल्यानंतरही हे बैल शर्यतीमध्ये विशेष कामगिरी करू शकणार नाहीत. त्यामुळे हे बैल विकत घेण्यासाठी मोजलेली किंमत, त्यांना जोपासण्यासाठी त्यांच्यावर खर्च केलेली रक्कम हे सर्व वाया जाईल अशी भीती असल्यानं बैलगाडा मालकांसमोर आर्थिक समस्या उद्भवू शकते.

बैलगाडा मालकांची मागणी:

  • लसीकरण झालेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी परवानगी द्यावी.

  • बैलांना रोज फेरी मारणं तसंच स्पर्धेमध्ये पळवणं हे गरजेचं आहे.

  • आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी सशर्त परनानगी देण्यात यावी

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news